पठाणकोटमध्ये पोलिसांच्या वर्दितील चार संशयित अटकेत

पठाणकोटमध्ये पोलिसांच्या वर्दितील चार संशयित अटकेत

पठाणकोटमध्ये पोलिसांच्या वर्दितील चार संशयित अटकेत

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या वर्दीतील चार संशयितांना पोलिसांनी अटक केले आहे. या संशयाताना पोलिसांनी एका स्कॉर्पियो गाडीमधून अटक केले आहे. या गाडीची नंबरप्लेट ही हिमाचल प्रदेशची आहे.पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी चालू असताना नंगलपूर गावाजवळ या चारही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा – दहशतवाद्याच्या आईला दिलेले वचन भारतीय सैन्याने पाळले

शादीपूरमध्ये दिसले होते अतिरेकी

काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवाद्यांनी पंजाबतर्फे भारतात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. गेल्या आठवड्यात पठाणकोटच्या शादीपूर गावात एका शेतकऱ्याने सहा दहशतवाद्यांना बघितले होते. पोलिसांना जेव्हा या गोष्टीविषयी माहिती मिळाली, तेव्हा ते ताबडतोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अतिरेक्यांना शोधण्याचा फार प्रयत्न केला होता, पण ते निसटले होते. या दहशतवाद्यांकडून अमृतसरमध्ये ग्रेनेड हल्ला देखील करण्यात आला आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला पोलिसांनी चार संशियतांना अटक केली होती.


हेही वाचा – इस्लामिक स्टेटच्या संशयित अतिरेक्यांना दिल्लीतून अटक

First Published on: November 30, 2018 4:21 PM
Exit mobile version