देशात आढळले 4 हजार 777 नवीन कोरोनाबाधित, रुग्ण बरे होण्याचा दर 98.72 टक्के

देशात आढळले 4 हजार 777 नवीन कोरोनाबाधित, रुग्ण बरे होण्याचा दर 98.72 टक्के

कोरोना वाढवतोय चिंता 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 4 हजार 777 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.58 टक्के इतका आहे. तर, या कालावधीत 5 हजार 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 43 हजार 994 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.10 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 196 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 39 लाख 95 हजार 610 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.72 टक्के इतका आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.58 टक्के इतका असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.63 टक्के इतका आहे. आतापर्यंत 89.36 कोटी चाचण्या घेण्यात आल्या. तर, गेल्या 24 तासांमध्ये 3,02,283 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या.

राज्यात 619 नवे रुग्ण
राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. राज्यात शनिवारी 619 इतक्या नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. एकूण सक्रिय रुग्ण 3 हजार 709 आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 752 रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 457 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 686 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 79,66,768 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे.

आतापर्यंत 217.56 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 217.56 कोटी (94.76 कोटी दुसऱ्या मात्रेच्या स्वरुपात तर 20.34 कोटी क्षमतावर्धक यात्रेच्या स्वरूपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 15,63,151 लस मात्रा देण्यात आल्या.

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयींना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 4.09 कोटीहून जास्त (4,09,40,886) किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 203.53 (2,03,53,52,325) लसीच्या मात्रा विनामूल्य आणि थेट राज्य अधिग्रहण श्रेणीच्या माध्यमातून पुरवल्या आहेत. 3.35 कोटीहून अधिक (3,35,16,390) कोविड प्रतिबंधक लसमात्रा अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे न वापरलेल्या आणि शिल्लक आहेत.

First Published on: September 25, 2022 1:41 PM
Exit mobile version