नीरव मोदीमुळे कॅनडातील नवरदेवाचे लग्न मोडले

नीरव मोदीमुळे कॅनडातील नवरदेवाचे लग्न मोडले

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला नीरव मोदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा पुन्हा एकदा एक कारनामा समोर आला आहे. नीरव मोदीमुळे कॅनडात राहणाऱ्या एका व्यक्तीचं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. पॉल अल्फान्सो नावाच्या एका कॅनेडियन व्यक्तीने नीरव मोदीकडून हिऱ्याची अंगठी खरेदी केली होती. मात्र ही अंगठी खोटी निघाली आणि त्यामुळे पॉलचं लग्न देखील मोडल्याचे समोर आले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.

नेमके काय घडले?

पॉल हे २०१२ मध्ये पहिल्यांदा नीरव मोदीला भेटले होते. पुढे या दोघांची खूप चांगली ओळख देखील झाली होती. पॉल अल्फान्सो या कॅनेडियन व्यक्तींने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी हॉंगकॉंमधून नीरव मोदीकडून दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. एप्रिल महिन्यात पॉलनं नीरव मोदीला साखरपुड्यासाठी एक विशेष अंगठी तयार करायला सांगितली. तसेच ही अंगठी बनवण्यासाठी १ लाख डॉलर इतके बजेट असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या अंगठीची किंमत ८८.७२ लाख रुपये इतकी होती. यानंतर पॉलच्या प्रियसीने आणखी एका अंगठीची ऑर्डर दिली. २.५ कॅरटच्या अंगठीची किंमत ८० हजार डॉलर म्हणजेचे ५९.१४ लाख रुपये इतकी होती. दोन्ही मिळून या अंगठ्यांची किंमत १ कोटी ४७ लाख रुपये इतकी झाली. पॉलने हॉंगकॉंगमधील नीरवच्या खात्यात पैसे जमा केले.

असे कळले सत्य

पॉलला दोन्ही अंगठ्या मिळाल्या आणि या अंगठ्या खऱ्या असल्याचे प्रमाणपत्र लवकरच पाठवा असे पॉलने नीरव मोदीला सांगितले. गर्लफ्रेंडला अंगठ्यांचा विमा काढायचा असल्यानं लवकर प्रमाणपत्र पाठवण्यात याव असे पॉलने नीरवला सांगितले. मात्र तो टाळाटाळ करु लागला. त्यानंतर पॉलच्या गर्लफ्रेंडला नीरव टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले. तिने त्या अंगठ्या घेऊन तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यावेळी या अंगठ्यामध्ये वापरण्यात येणारे हिरे खरे नसून ते खोटे असल्याचे समोर आले. त्यानंतर पॉलला पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदींने कोटींचा गंडा घातल्याचे समजल्यानंतर पॉलच्या गर्लफ्रेंडने देखील अंगठ्यांमधील हिरे खोटे आहेत असे सांगत धक्का दिला.

का मोडले पॉलचे लग्न?

पॉल अल्फान्सो ही एक कॅनेडियन व्यक्ती आहे. हे एका पेमेंट प्रोसेसिंग कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तू हुशारींने काम करतोस आणि तुझी २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तुझ्या लक्षात देखील आले नाही. हा व्यवहार करताना तुला सावध राहता आले नाही का? असे प्रश्न करत तिने पॉलशी लग्न मोडून त्याला सोडून निघून गेली.

First Published on: October 8, 2018 9:05 PM
Exit mobile version