‘ट्राय’च्या नव्या नियमामुळे निशुल्क वाहिन्यांचा टीआरापी टॉपवर

‘ट्राय’च्या नव्या नियमामुळे निशुल्क वाहिन्यांचा टीआरापी टॉपवर

काही वर्षांपूर्वी डायरेक्ट टू होम (डीटीएच) ही सेवा टेलिव्हिजन चाहत्यांना उपसलब्ध करून दिली होती. मात्र, स्पोर्टस, न्यूज, एन्टरटेन्मेट, नॉलेज असे वेगवेगळे प्रक्स सर्व्हिस प्रोव्हाडर्सने ग्राहकांना पुरवले. पण ग्राहकांना ते महाग वाटू लागले. त्यावर उपाय म्हणुन, नुकतेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) ने ग्राहकांसाठी नवे नियम आणले आहे. आपल्याला पसंतीच्या वाहिन्या आपण निवड शकतो. आवड आणि किंमत लक्षात घेऊन वाहिनीची स्वतंत्र पणे निवड करू शकतो. उपभोकर्त्यांना निवडीचे हक्क ट्रायकडून देण्यात आले होते. हे नियम १ फेब्रुवारी पासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, हा नियम लागू करताना अनेक लोकप्रिय वाहिन्यांचा टीआरपीमध्ये घसरण झाली असल्याचे समोर येत आहे.

सशुल्क वाहिन्यांकडे पाठ

कोणती वाहिनी जास्त बघितली जाते याची आकडेवारी प्रसिद्ध करणाऱ्या ब्राडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाने (बार्क) या वर्षी टीआरपीचे आकडेवारी सार्वजनिक करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आले होते. मात्र, ट्रायने त्यांना आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. पण बार्कने आदेशाला जूमानले नाही आणि आता अचानक बार्कने १३ आठवड्यात वाहिनेचे टीआरपी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्या आकडेवारीत असे सिद्ध झाले की, सशुल्का वाहिनांच्या टीआरपी आकडेवारी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

या लोकप्रिय वाहिनींच्या आकटेवारीत घट

दरम्यान, बार्कने दिलेल्या आकडेवारी नुसार मनोरंजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत कमालीची घट झाली आहे. मराठी वाहिन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘फक्त मराठी’ नावाची वाहिनी आहे. तर लोकप्रियतेमुळे पहिल्या क्रमांक न सोडणारी ‘झी मराठी’ वाहिनी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तसेच ‘कलर्स’, ‘झी टॉकीज’ आणि ‘स्टार प्रवाहा’ वाहिन्यांना तिसरा, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. तसेच हिंदी वाहिन्यांची आकडेवारी बघितली असता, ‘स्टार प्लस’, ‘झी टीव्ही’, ‘कर्लस’, ‘सोनी’ या लोकप्रिय वाहिन्यांना मागे सारत ‘दंगल टीव्ही’ या निशुल्क वाहिनी पहिला तर ‘बिग मॅजिक’ या वाहिनीने दुसरे स्थान मिळवले आहे. तर लोकप्रिय वाहिन्यांपैकी ‘स्टार प्लस’ वाहिनीला तिसरे, ‘झी टीव्ही’ला चौथे, ‘सोनी टीव्ही’ला पाचवे आणि ‘कलर्स टीव्ही’ला सहाव्या स्थानावर समाधान मानायला लागले आहे. तसेच ‘डीडी नॅशनल’ वाहिनी पहिल्या दहा आली आहे. त्यामुळे सशुल्का वाहिन्यांपेक्षा निशुक्ल वाहिन्यांना उपभोगकर्त्यांनी जास्त प्रतिसाद देऊन लोकप्रिय वाहिनींची आकडेवारी घट झाल्याचे समोर आले आहे.

First Published on: April 9, 2019 11:29 AM
Exit mobile version