कन्हैय्यासाठी येच्चूरीपासून ते जावेद अख्तपर्यंत स्टार प्रचारक मैदानात

कन्हैय्यासाठी येच्चूरीपासून ते जावेद अख्तपर्यंत स्टार प्रचारक मैदानात

कन्हैय्या कुमार

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि बिहारच्या बेगूसराय येथून भाकपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कन्हैय्या कुमार याचा प्रचार अनेक स्टारप्रचारक करणार आहेत. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, सुधाकर रेड्डी यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांसोबतच बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर देखील त्याचा प्रचार करणार आहेत. कन्हैय्या कुमार बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह याच्यासोबत कन्हैय्या कुमारची थेट लढत होणार आहे.

भारतीय कम्युनिष्ट पार्टीच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, कन्हैय्या कुमारसाठी येत्या २३ एप्रिलला म्हणजे उद्या बेगूसरायमध्ये सिताराम येच्च्युरी यांची सभा होणार आहे. तर २३ एप्रिल आणि २४ एप्रिलला सुधाकर रेड्डी सभा घेणार आहेत. भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी राजा पाच दिवसिय बिहारच्या दौऱ्यावर येत आहे. सोमवारी ते पटणा येथे येणार आहेत. तर कन्हैय्या कुमारसाठी ते २३ एप्रिल आणि २६ एप्रिलला सभा घेणार आहेत. तर बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर २३ एप्रिलला बेगूसरायमध्ये येणार आहे. तसंच प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज देखील शनिवारी बेगूसराय येथे येणार आहेत.

First Published on: April 22, 2019 1:04 PM
Exit mobile version