Petrol Diesel Price: इंधनाच्या महागाईचा भडका; अखेर मुंबईत डिझेलची शंभरी; तुमच्या शहरात किती भाव?

Petrol Diesel Price: इंधनाच्या महागाईचा भडका; अखेर मुंबईत डिझेलची शंभरी; तुमच्या शहरात किती भाव?

Petrol Price Today : IOCL कडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव

सतत वाढणाऱ्या इधनाच्या दरांमुळं सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईसह देशभरात मागील ९ दिवसांमधील आठव्यांदा दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजचे पेट्रोलनंतर आता डिझेलच्या किंमतीनं ही शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रति लिटर ८० पैशांनी वाढले आहेत. त्यामुळेच मुंबईत आता पेट्रोल ११५.८८ रुपये लिटर तर डिझेल १००.१० रुपये लिटर दराने मिळत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मागील ९ दिवसांमधील ही देशातील आठवी दरवाढ आहे. ९ दिवसांमध्ये इंधनाचे दर लिटरमागे ५ रुपये ६० पैशांनी वाढलं आहे. पेट्रोलच्या दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ करण्यात आल्यानं या देशभरातील मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर १०० रुपयांच्या पुढे गेल्याचं पहायला मिळालं होतं. मंगळवारी पहिल्यांदा दिल्लीत पेट्रोलचा दर १००.२१ रुपये प्रति लिटर झाला. यात आता ८० पैशांनी भर पडल्याने दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०१.०१ रुपयांना मिळत आहे.

विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२१ पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ३० डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे.

प्रमुख शहरातील दर
पेट्रोल       डिझेल

२२ ते २९ मार्चपर्यंत झालेली इंधन दरवाढ

First Published on: March 30, 2022 8:47 AM
Exit mobile version