PMC Bank scam : फरार मेहूल चोक्सीचे फिल्मी स्टाईलने पलायन, लवकरच भारताकडे हस्तांतरण होणार

PMC Bank scam : फरार मेहूल चोक्सीचे फिल्मी स्टाईलने पलायन, लवकरच भारताकडे हस्तांतरण होणार

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १४००० कोटी रुपयांचा घोटाळा करत फरार झालेला मुख्य सुत्रधार उद्योगपती मेहुल चोक्सीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॅरिबियन बेटावरील अँटिग्वा व बार्बुडामधून फरार झालेला मेहुल चोक्सी तीन दिवसांनंतर डॉमिनिकामध्ये पोलिसांच्या हाती लागला. तीन दिवसांपूर्वी चोक्सीने अँटिग्वामधून पलायन केले होते. यानंतर अँटिग्वा पोलिसांनी चोक्सीची शोध मोहीम सुरु केली होती. त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. यानंतर अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या संशय तपास यंत्रणांना आला. मात्र डॉमनिकामध्ये पोहचताच त्याला पोलिसांनी अटक केली. जानेवारी २०१८पासून चोक्सी अँटिग्वामध्ये राहात होता. यात लवकरचं चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.

 नीरव मोदी व चोक्सीच्या भारत प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरु 

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १३,५०० हजार कोटींच्या घोटाळ्यातील चोक्सी हा मुख्य आरोपी आहे. यातील आणखी एक प्रमुख आरोपी म्हणजे नीरव मोदी. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी घोटाळा करुन विदेशात पलायन केले. मात्र या दोघांना आता भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

चोक्सी समुद्रामार्गे पळून जाण्याचा तयारीत 

चोक्सी गेली अनेक दिवस कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून होता, मात्र अँटिग्वा न्यूजरुम या स्थानिक वृत्त संस्थेने चोक्सी रविवारपासून बेपत्ता झाला होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही तेव्हापासून पोलीसांनी चोक्सीचा शोध सुरु केला, अखेर तीन दिवसांनी पोलिसांना चोक्सीला यशस्वीरित्या पकडले.

याचदरम्यान चोक्सी पकडलो जाण्याच्या भीतीने नावेच्या मदतीने समुद्रामार्गे डोमनिका शहरात पोहचला होता. तिथून तो क्यूबा देशात पळून जाण्याचा तयारीत होता. यावेळी बेपत्ता झालेल्या चोक्सीविरोधात पोलिसांनी यलो नोटीस जारी केली होती. मात्र यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सध्य़ा चोक्सीला अँटिग्वा आणि बार्बुडच्या रॉयल पोलिसांच्या स्वाधिन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी आपला अशील फरार झाल्याचे म्हटले होते.गेल्या रविवारी चोक्सीला कारमधून जाताना पाहण्यात आले होते. ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.

अँटिग्वा आणि बार्बुडाच्या संसदेत गोंधळ

अँटिग्वा आणि बार्बुडाच्या संसदेत विरोधकांनी चोक्सी बेपत्ता झाल्याचा विषय उपस्थित केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. विरोधकांच्या प्रश्नावर पंतप्रधान गेस्टन ब्राऊन म्हणाले की, चोक्सीचा शोध घेण्यासाठी आपले सरकार आणि भारत सरकार तसेच शेजारी देश आणि आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना मिळून काम करत आहेत.


 

First Published on: May 27, 2021 1:24 PM
Exit mobile version