दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेमुळे दरमहा हजार-दीड हजार कोटींची कमाई होणार; NHAI सोन्याची खाण- गडकरी

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेमुळे दरमहा हजार-दीड हजार कोटींची कमाई होणार; NHAI सोन्याची खाण- गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ला ‘सोन्याची खाण’ असे म्हटले आहे. गडकरींनी अलीकडेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक लांबचा प्रवास पूर्ण केला असून हा केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी रविवारी म्हणाले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यास म्हणजेच तो कार्यान्वित झाल्यावर केंद्राला दरमहा १ हजार ते दीड हजार कोटी रुपयांचा टोल मिळून या माध्यमातून कमाई होईल. तसेच हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस वे २०२३ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. एनएचएआयचे वार्षिक टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वाढून १.४० लाख कोटी रुपये होईल असेही त्यांनी म्हटले जे सध्या ते ४०हजार कोटींच्यावर आहे.

गडकरी यांनी अलीकडेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्याने अनेक दौरे केले. राष्ट्रीय राजधानी व्यतिरिक्त हा एक्सप्रेस वे इतर चार राज्यांतून जाणार आहे. गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा ही जागतिक दर्जाची यशोगाथा असणार आहे. हा आठ लेनचा एक्सप्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून जाईल. यासह, राष्ट्रीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी दरम्यानचा प्रवास सध्याच्या २४ तासांच्या तुलनेत १२ तासांपेक्षा अर्ध्यावर येईल.

एनएचएआयवर कर्जाचा भार खूप जास्त असल्याच्या चिंतेत गडकरी म्हणाले, नोडल एजन्सीला ‘ट्रिपल ए’ रेटिंग मिळाले आहे आणि त्याचे सर्व रस्ते प्रकल्प उत्पादक आहेत. ते म्हणाले की एनएचएआय कर्जाच्या जाळ्यात नाही. ही सोन्याची खाण आहे. NHAI चे टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वार्षिक १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल जे आता ४० हजार कोटी रुपये इतके आहे. तसेच मार्च महिन्यात संसदेच्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीवरील स्थायी समितीने एनएचएआयवरील ९७ हजार ११५ कोटी रुपयांच्या कर दायित्वावर चिंता व्यक्त केली होती.


उत्तराखंडमध्ये केजरीवाल यांनी केला आश्वासनांचा वर्षाव; ६ महिन्यांत १ लाख नोकऱ्या आणि दरमहा ५ हजारांचा भत्ता
First Published on: September 19, 2021 4:08 PM
Exit mobile version