राष्ट्रपतींनी दिल्या गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा!

राष्ट्रपतींनी दिल्या गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा!

गणपती

आजपासून राज्यासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. ६४ कलांचा अधिपती गणराय आज भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. गणरायाच्या आवडीच्या नैवेद्यापासून ते त्याच्या पूजेपर्यंत सर्वच गोष्टींची आपण गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहोत. आज मोठ्या भक्तिभावात, ढोल गजराच्या निनादात गणरायाचे आगमन होणार असून प्रत्येक व्यक्ती गणेशोत्वाच्या वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देखील देत आहे. तर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतींही दिल्या शुभेच्छा

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याप्रमाणेच वेंकय्या नायडू यांनी देखील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देशवासीयांना दिल्या आहेत.

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गणेश चतुर्थी निमित्त देशवासीयांना यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – ‘या’ मुहूर्ताला करा श्री गणरायाची प्रतिष्ठापना


 

First Published on: September 2, 2019 8:02 AM
Exit mobile version