गौरी लंकेश हत्या प्रकरण; आणखी एका संशयिताला एटीएसने केली अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरण; आणखी एका संशयिताला एटीएसने केली अटक

गौरी लंकेश हत्याप्रकरण

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. बेळगाव एटीएसने बेळगावमधून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. सागर लाले असं या आरोपीचे नाव आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारेला सागर लालेने मदत केली असल्याचे समोर आले आहे.

सागर लालेला बंगळुरुतून अटक

बंगळुरुच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी परशुराम वाघमारे याला जून २०१८ ला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणी १२ संशयित आरोपींना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. बंगळुरु एटीएसने सापळा रचून सागर लालेला अटक केली. गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला जात होता तेव्हा परशूराम वाघमारे याला सागर लाले याने आश्रय दिले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास आणि सागर लालेची चौकशी सध्या बंगळुरु एटीएसकडून सुरु आहे. या हत्याप्रकरणातील आणखी सुत्रधार समोर येण्याची शक्यता आहे.

अशी केली होती गौरी लंकेश यांची हत्या

५ सप्टेंबर २०१७ ला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. गौरी लंकेश यांच्या हत्येपूर्वी दोन वेळा त्याच्या घराबाहेर आरोपींनी रेखी केली असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये समोर आले होते. पांढरा शर्ट आणि ब्लॅक हेलमेट घालून बाईकवरुन आलेल्या आरोपीने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजता गोरी लंकेश यांच्या घराबाहेर रेखी केली होती. त्यानंतर ८ वाजता जेव्हा गौरी लंकेश घरी आल्या असता घराच्या बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला होता.

First Published on: August 30, 2018 5:50 PM
Exit mobile version