झोपेतच मुलीचे केले अपहरण; कारमध्ये केला सामुहिक बलात्कार

झोपेतच मुलीचे केले अपहरण; कारमध्ये केला सामुहिक बलात्कार

प्रियकराबरोबर पळून गेलेल्या मुलीवर, दोन मित्रांनी केला बलात्कार!

डबुआ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कॉलनीत घरात खुसून १३ वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यांनतर तिच्या सामुहिक बलात्कार करण्यात आला. शुक्रवार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा हे क्रूरकृत्य करण्यात आले. अतिशय निर्दयीपणे तिच्यावर एका कारमध्ये कूकर्म केल्यानंतर रात्रभर तिला तिथेच ठेवले आणि सकाळी तिच्या घरासमोरील रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर तिथून पळून गेले. ती मुलगी कशीबशी घर आली आणि तिच्या आईला सर्व घटना सांगितली.

दुसऱ्यांदा केला सामुहिक बलात्कार 

दुर्दैवाची बाब म्हणजे त्या मुलीसोबत ही घटना पहिल्यांदाच घडली नव्हती. यापूर्वी १२ नोव्हेंबरच्या रात्रीदेखील तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी शेजारी राहणार तरुण आणि त्याच्या मित्रांवर आरोप लावण्यात आला आहे. सध्या त्या मुलीची प्रकृती बरी नसून ती अवस्था सुधारल्यानंतर मॅजिस्ट्रेटच्या समोर तिचा जबाब नोंदवला जाईल. पोलिसांनी पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यानुसार अपहरण आणि इतर कलम आरोपींवर लावण्यात आले आहेत. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी ४ टीम बनवली आहेत.

नेमक काय घडलं

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी पहिल्या माळ्यावरील तिच्या रुममध्ये झोपली होती. रात्री साधारण १२ च्या सुमारात त्यांच्या शेजारचा मुलगा काही मित्रांसोबत तिथे आला. तिच्या तोंडाला कपडा बांधून एका शिडीच्या सहाय्याने घराच्या मागच्या बाजूने तिला पळवून घेऊन गेला. तिथे एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. त्या मुलीला टाकून अनोळखी ठिकाणी घेऊन गेले. त्यांनतर त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. सकाळ होताच तिला तिच्या घराजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिले. मुलीने सांगितले की अशीच घटना तिच्यासोबत १२ तारखेलाही घडली होती. तेव्हा रिक्षामध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर कोणाकडेही याबाबत वाच्यता करू नका अशी धमकी संपूर्ण कुटुंबाला देण्यात आली होती.

First Published on: December 2, 2018 10:06 AM
Exit mobile version