Goa Assembly Election 2022: गोव्यात 301 उमेदवारांचे भवितव्य 11 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती, उद्या होणार मतदान

Goa Assembly Election 2022: गोव्यात 301 उमेदवारांचे भवितव्य 11 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती, उद्या होणार मतदान

Goa Assembly Election 2022: गोव्यात 301 उमेदवारांचे भवितव्य 11 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती, उद्या होणार मतदान

गोव्यात विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मते मिळवण्यासाठी लोकांचे दरवाजे ठोठावण्याची शर्यत सुरू केली आहे. गोव्यात यावेळी बहुपक्षीय लढत होण्याची अपेक्षा आहे. देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील 301 उमेदवारांचे भवितव्य आता 11,64,522 मतदारांच्या हाती आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजपसाठी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यावेळी सत्ताधारी भाजपची स्पर्धा आप, अडचणीत सापडलेल्या काँग्रेस आणि टीएमसीशी होणार आहे, हे पक्ष पहिल्यांदाच राज्य निवडणुकीत भाग घेत आहेत. मात्र यावेळी लहान पक्षही गोव्यात सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात असे चित्र दिसून येतेय.

याचदरम्यान आता एका हिंदी वाहिनीने केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’विरोधात काँग्रेस नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ज्यात पक्षाच्या काही उमेदवारांनी निवडणुकीनंतर भाजपमध्ये येण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला होता. टीएमसीनेही रात्री उशिरा अशीच तक्रार नोंदवली. तर आठवडाभरापूर्वी काँग्रेसच्या ३७ उमेदवारांनी आणि त्यांच्या मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तीन उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेतली. हे सर्व सोनिया गांधींपर्यंत पोहोचवता यावे म्हणून त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रतिज्ञापत्रातही मांडले.

दरम्यान गोवा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय वातावरण तापवले आहे. त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांवर निशाणा साधत जवाहरलाल नेहरूंवर गोवा मुक्तीसाठी सुमारे 15 वर्षे उशीर केल्याचा आरोप केला. जेणेकरून शांतताप्रेमी नेत्याच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचू नये.

पर्रीकर यांच्या निधनानंतर यावेळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपची धुरा सांभाळत आहेत. सेन्क्वेलिम येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणाऱ्या 48 वर्षीय नेत्याच्या नेतृत्वाचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. 2017 मध्ये प्रादेशिक मित्रपक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या मदतीने भाजपने केवळ 13 जागा जिंकूनही सरकार स्थापन केले होते. यावेळी पक्षाने ‘बाविसंत बावीस प्लस’ (२०२२ मध्ये २२ प्लस) असा नारा देत स्वबळावर बहुमत मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट दिले नाही त्यामुळे ते आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार आहेत. तसेच पणजीत भाजपचा पराभव करण्याच्या तयारीत आहेत.

गोव्यात आपचे नेते अरविंद केजरवील यांनी अनेक आश्वासने देऊन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, गरज भासल्यास भाजपशी युती नसलेल्या पक्षांशी निवडणूकोत्तर युती करण्यास तयार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC टीमसोबत गोव्यात पोहोचल्या आहेत. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ममता बॅनर्जी राज्यात म्हणाव्या तश्या सक्रिय दिसल्या नाहीत. AAP आणि TMC मात्र आप आणि टीएमसी पक्षांना ‘बाहेरील’ असल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले.


तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंची प्रतिक्रिया


First Published on: February 13, 2022 1:45 PM
Exit mobile version