मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं, ‘गोवा कोरोनामुक्त होण्यामागचं गमक’!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं, ‘गोवा कोरोनामुक्त होण्यामागचं गमक’!

Coronavirus: गोव्यात पर्यटकांना बंदी; गोवा सरकारचा निर्णय

कोरोनाशी गोव्याची लढाई केव्हाच संपलीये. गोव्यात ३ एप्रिलला शेवटचा रूग्ण आढळला होता. १९ एप्रिल रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोवा हे राज्य आता ग्रीन झोनमध्ये आहे. गोव्यात ७५८ जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सात जणांना  आता बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहे.  गोवा कसं कोरोनामुक्त झालं याची माहिती खुद्द प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

प्रमोद सावंत म्हणतात, ३ एप्रिलनंतर गोव्यात एकही कोरोनाचा रूग्ण सापडलेला नाही. राज्यातील डॉक्टरांच्या टीमनं उत्तम काम केलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनीही यात मोलाची भूमिका बजावली आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गोवा करोनामुक्त झालं,” असं मत सावंत यांनी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले, इतर राज्यांप्रमाणे इथल्या कामगारांन गावी जायचं नाहीये. काही कामगारांना गावी जाण्याची इच्छा आहे त्यांची सोय आम्ही करत आहोत. ज्या मजूरांना गावी जायचं आहे त्यांना सुखरूप गावी पोहचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा कायम सन्मानच करतो. पण कोरोनामुळे सध्या वेगळी परिस्थीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारनं दिलेल्या गाईडलाइन्सच पालन करायला हवं.”

मद्यविक्री विषयी बोलताना प्रमोद सावंत म्हणाले, लॉकडाउनमुळे अनेकजण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवरही जाऊ शकत नव्हते. तसंच राज्यातील मद्यविक्रीही बंद ठेवण्यात आली होती. परंतु ग्रीन झोनमध्ये सरकारनं जी सुट दिली आहे ती आता या ठिकाणीही लागू होईल. त्यामुळे गोव्यात मद्यविक्री सुरू होण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांना कॅडबरीकडून Thank You!


 

First Published on: May 2, 2020 2:32 PM
Exit mobile version