सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त

सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त

Gold

गेल्या काही दिवसांपासून सोनेच्या दर सर्वात मोठी घसरण झाली आहे. ५० हजारांचा आकडा पार केलेल्या सोन्याचे दर ११ हजारांनी खाली आले. यामुळे सोन्याचे दर आता ४४ हजारांपर्यंत स्थिरावले आहेत. आज दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर २१७ रुपये प्रति १० ग्रामची घसरणा झाल्याने सोन्याचा आजचा दर ४४,३७२ रुपयांवर आले आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. (gold silver rate on 4 march) मात्र सोन्याचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने सामान्यांनाही सोने परवडणारे झाले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीची किंमत (Silver Price) 1,217 रुपये झाली.

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात थोडी वाढ झालेली पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १७१७ डॉलर्स प्रति औस इतके झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ दिसून आली.


हेही वाचा- OTT वर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमांचे स्क्रिनिंग होणे गरजेचं- सर्वोच्च न्यायालय

 

 

First Published on: March 4, 2021 8:13 PM
Exit mobile version