Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या दर

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या दर

सोने 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता ग्राहक सराफा बाजाराकडे वळले आहेत.

आज सोनं-चांदी या दोघांच्या दराच घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, सोन्याचे उच्च दरापासून जवळपास ८ हजार रुपये स्वस्त ट्रेड करत आहे. गेल्या वर्षी २०२०मध्ये ऑगस्टमध्ये सोन्याचे दर ५५ हजारांहून अधिक प्रति १० ग्रॅम होते. त्यावेळेसचे हे सोन्याचे दर उच्चांकी होते. पण आज सोनं ४८ हजार रुपयांच्या काही वरती ट्रेड करत आहे. परंतु हे सोन्याचे दर ऑलटाईम उच्च दरापेक्षा ८ हजाराने स्वस्त झाले आहे.

सोनं-चांदीचे आजचे दर काय आहेत?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर पाहिले तर, ४५ रुपये म्हणजेच ०.०२ टक्के घसरण होऊन ४८ हजार २७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात ४९ रुपये म्हणजेच ०.०८ टक्क्यांची घसरणीसोबत ६१ हजार ५३३ रुपये प्रति किलो ट्रेड करत आहे.

जागतिक बाजारातील हालचाल

दरम्यान आज सकाळी जागतिक बाजारात सोनं-चांदीची घसरण ट्रेड होत होती. जागतिक बाजारातील अमेरिकेतील बाजाराचा परिणाम आज सोनं आणि चांदीच्या सेंटीमेंटवर पडत आहे. अमेरिकी फेडरल रिजर्व्ह व्याजदर तेजीत ठेवण्याच्या आशेने डॉलरच्या दरात उसळी घेतली. याचा परिणाम सोनं-चांदीच्या घसरणीच्या स्वरुपात दिसून येत आहे.


हेही वाचा – अरे व्वा! दररोज २० रुपये जमवून मिळवा १० कोटी रुपये!


 

First Published on: December 14, 2021 3:16 PM
Exit mobile version