Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण

Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण

Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण

ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्या- चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. दिल्लीसह संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज राजधानी दिल्लीत प्रति १० ग्रॅम सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मात्र काही प्रमाणात किंमत कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.  एचडीएफसी सिक्योरिटीजच्या आकडेवारीनुसार, दिल्लीच सोन्याचा दर ४६,२७२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा दर ४६,३७२ रुपये प्रति १० ग्रॅम होता. देशांतर्गत सराफा बाजारपेठेत चांदी दर १३४ रुपये प्रति किलोग्रॅमने कमी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे चांदीची प्रति किलो दर आता ६२,६३९ रुपये इतका झाला, मागीत सत्रात ही किंमत ६२,७७३ रुपये प्रति किलोग्रॅम होती.

जागतिक पातळीवर सोन्याचे चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव प्रति औंस १,८१५ डॉलरवर आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत २४.१६ डॉलर प्रति औंस आहे.

वायदा बाजारातील सोन्याचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर २०२१ मध्ये डिलिव्हरी वाले सोन्याचा दरात ९० रुपये म्हणजे ०.१९ टक्क्यांनी घटून ४७,०७४ रुपये प्रति १९ ग्रॅम होते. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट सोन्याच्या किमतीत ९२ रुपये प्रति १० ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली. यासह डिसेंबरमध्ये वितरण सोन्याचे दर ४७,२३० रुपये प्रति १० ग्रॅम राहिले.

चांदीची किंमत

डिसेंर २०२१ मध्ये चांदीचे दर ६६ रुपये म्हणजे ०.१० टक्के तेजीने प्रति किलोग्राम ६३,६५३ रुपये झाले होते. त्याचप्रमाणे, सप्टेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्टवाल्या चांदीच्या किंमतीत २७८ रुपयांनी वाढून ६३,३०३ रुपये प्रतिकिलो झाली.


Telegram ॲपचा डाऊनलोडमध्ये नवा रेकॉर्ड, Whatsapp लाही टाकले मागे

First Published on: August 31, 2021 7:11 PM
Exit mobile version