Gold Price Today: अक्षय तृतीयेच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या किती रूपयांनी झालं स्वस्त

Gold Price Today: अक्षय तृतीयेच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या किती रूपयांनी झालं स्वस्त

Gold Price Today

येत्या १४ मे रोजी अक्षय तृतीया सण साजरा केला जाणार आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अक्षय तृतीयेच्या पूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सोने-चांदी दोन्हींचे दर घसरले होते, तर बुधवारीही बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या घसरणीसह व्यापार सुरू आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदा ०.३२ टक्क्यांनी घसरले आणि सकाळी पावणे दहा वाजता सोनं ४७ हजार ४८० रूपये प्रति दहा ग्रॅमच्या किंमतीवर व्यापार झाला. त्याच वेळी, चांदीचा वायदा ०.७६ टक्क्यांनी घसरून ६७ हजार ८२० रुपये प्रतिकिलोग्रॅमवर व्यापार करीत आहे.

तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा दर

Good Returns वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ४ हजार ५९२, ८ ग्रॅम सोन्याची किंमत ३६ हजार ७३६ तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५ हजार ९२०, १०० ग्रॅम सोन्याची किंमत ४ लाख ५१ हजार २००
रूपयांनी विकले जात आहे.

प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर

चांदीची एक किलोची किंमत प्रति किलो ७१ हजार ५०० रुपये आहे. दिल्लीत चांदीची विक्री ७१ हजार ५०० रूपये प्रति किलो आहे. यासह मुंबई आणि कोलकाता येथे चांदीची किंमत देखील सारखीच आहे. तर चेन्नईत चांदीची किंमत प्रति किलो ७५ हजार ९०० रुपये आहे.

First Published on: May 12, 2021 5:08 PM
Exit mobile version