खुशखबर! देशात सोने झाले स्वस्त तर चांदी चकाकली

खुशखबर! देशात सोने झाले स्वस्त तर चांदी चकाकली

जनता कर्फ्यूचा सोने व्यवसायाला मोठा फटका, दोन दिवसात १२५ कोटींचा व्यवसाय ठप्प

देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होताना दिसत आहे. तर चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात घसरण झाली तर चांदीला आज बाजारात चांगलीच चकाकी मिळाली आहे. आज सोन्याचा भाव ४६४०० रुपयांवर आहे. तर चांदीने ७० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे बाजारात आज सोन्यापेक्षा चांगला भाव मिळाला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याची किंमत १३० रुपयांची खाली आली त्यामुळे सोन्याचा भाव आज ४६३७४ रुपयांपर्यंत झाला आहे. सध्या चांदीच्या किमतीत २०७ रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव ४९७५० रुपये झाला आहे.

good returns या वेबसाईटच्या माहितीनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७५० रुपये आहे.दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५५० रुपये आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ३५० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटसाठी तो ४९६९० रुपये झाला आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५७५० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६७५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३९३० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४७९२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६५० रुपये आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर घसरताना दिसत आहे तर चांदीचे भाव नवे रेकॉर्ड बनवत आहे.

First Published on: February 25, 2021 5:05 PM
Exit mobile version