Gold Price Today : ओमिक्रॉनमुळे सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

Gold Price Today : ओमिक्रॉनमुळे सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

omicron gold silver prices today in india hike 13 december 2021 gold rate

लग्न-समारंभानिमित्त सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात ०.०३ टक्क्यांची तेजी पाहयला मिळाली. यामुळे ओमिक्रॉन विषाणूचा प्रभाव आत्ता सोन्याच्या दरावरही जाणवत असल्याचे म्हटले जातेय. यामुळे सोन्याचा दर ४८,१७७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर ०.२४ टक्क्यांनी वाढून चांदी प्रति किलोग्रॅम दर ६१,३०० रुपयांवर पोहचली आहे.

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढून ६८३ कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये गुंतवणूक दुपटीने वाढली आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडकडे गुंतवणूकदरांचे आकर्षण अजूनही दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ६८३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. कोरोनाच्या ओमिक्रॉनचे वाढते संकट पाहता गुंतवणूकदारांचे गोल्ड ईटीएफकडे लक्ष केंद्रीत होत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ३०३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती, तर सप्टेंबरमध्ये हीच गुंतवणूक ४४६ कोटी रुपयांवर पोहचली. तर ऑगस्टमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

ओमिक्रॉनची भीती

वरील गुंतवणुकीनंतर गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचा आकडा यंदा ४५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यावर्षी जुलै महिन्यात गोल्ड ईटीएफमधून ६१.५ कोटी रुपये काढण्यात आले. मात्र कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे आत्ता अर्थव्यवस्थेसमोरील चिंता अधिक वाढली आहे. बाजारातील अस्थिरतेपासून वाचण्य़ासाठी गुंतवणूकदार आता बचतीचे पारंपारिक पर्याय निवडत आहेत.


 

First Published on: December 13, 2021 4:54 PM
Exit mobile version