गुगलने कलरफुल डुडल बनवून साजरा केला प्रजासत्ताक दिन

गुगलने कलरफुल डुडल बनवून साजरा केला प्रजासत्ताक दिन

गुगलचे डुडल

गुगलने डुडलद्वारे 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. एक खास डुडल तयार करुन गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना दिली आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र मिळाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी तयार केलेले संविधान 26 जानेवारी 1950 साली अंमलात आणण्यात आले. तेव्हापासून देशभरामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर गुगलने हे डुडुल बनवले आहे. त्यामध्ये ऐतिहासिक स्मारकांसह भारताच्या सांस्कृतीक विविधता आणि समृध्दचे दर्शन घडते.

गुगलने तयार केलेल्या डुडलमध्ये राष्ट्रपती भवनासमोर विविध रंगांचा वापर करुन गुगुल असे लिहिले आहे. त्यामधील प्रत्येक अक्षर काही तरी संदेश देऊ जातो. गुगलने तयार केलेले हे डुडलची संकल्पना पर्यावरण, वास्तुकला, पोशाख, वन्यजीव, स्मारक आणि शेती यांच्यावर आधारीत आहे. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थत राहिले.

First Published on: January 26, 2019 2:00 PM
Exit mobile version