सात वर्षीय दिव्यांशीने रेखाटले आजचे गुगल डूडल

सात वर्षीय दिव्यांशीने रेखाटले आजचे गुगल डूडल

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांचा लळा होता. त्यामुळे त्यांचा वाढदिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने गुगल या सर्च इंजिनने आपल्या डूडलच्या माध्यमातून सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कसे आहे आजचे गुगल डूडल?

बालदिनानिमित्त गुगलतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या मुलीच्या चित्राची यंदा गुगल डूडलसाठी निवड करण्यात आली आहे. गुडगावमधील सात वर्षीय दिव्यांशी सिंघल हिने या स्पर्धेत बाजी मारली. दिव्यांशीने आपल्या डूडलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा तसेच जंगलतोड थांबविण्याचा संदेश दिला आहे. यासाठी तिने चालणारी वृक्षं रेखाटली आहेत. पुढील पिढीला जंगलतोडीच्या दुष्परिणांपासून वाचविण्याचा मोलाचा संदेश तिने या चित्रातून दिला आहे.

First Published on: November 14, 2019 8:59 AM
Exit mobile version