पहिल्या महिला गिर्यारोहकाला गुगलची डूडलद्वारे मानवंदना!

पहिल्या महिला गिर्यारोहकाला गुगलची डूडलद्वारे मानवंदना!

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक जुन्को ताबेई यांना गुगलने एका खास डुडलद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. जुन्को ताबेई यांची ही ८०वी जयंती आहे. जुन्को ताबेई या एक जगप्रसिद्ध गिर्यारोहक होत्या.

कोण आहेत जुन्को ताबेई?

२२ सप्टेंबर १९३९ या दिवशी फुकूशिमा जापान येथे त्यांचा झाला. १० वर्षाच्या असताना जुन्को ताबेई यांना शाळेच्या ट्रिपवर जुन्को ताबेई यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. १९७५ रोजी माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या. १९९२ मध्ये ‘सेवन समिट्स’ पूर्ण करणाऱ्या जुन्को ताबेई पहिल्या महिला ठरल्या. गुगल डूडलमध्ये जुन्को ताबेई या त्यांच्या जीवनकाळात सर केलेल्या ७ उंच शिखर सर करताना दिसत आहेत.

महिलांसाठी क्लबची स्थापना केली

१९६९ मध्ये जुन्को ताबेई यांनी गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या महिलांचा जपानमधील पहिल्या क्लबची स्थापना केली. ज्या काळी महिलांवर केवळ आपले घरदार आणि मुलांची काळजी सोपविण्यात येत होती. तेव्हा महिलांचे विश्व केवळ घरापुरते मर्यादित नसून त्यांनासुद्धा स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करता आले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी महिला क्लबची स्थापना केली होती. २०१२ मध्ये जुन्को ताबेई यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर २० ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचे निधन झाले.

First Published on: September 22, 2019 4:42 PM
Exit mobile version