RBI Governer Shaktikant Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला

RBI Governer Shaktikant Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला

RBI Governer Shaktikant Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे शक्तिकांत दास आता डिसेंबर २०२४ पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार सांभळणार आहेत.

शक्तिकांत दास यांचा १० डिसेंबर २०२१ रोजी कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र केंद्रीय मंत्रालयाने अधिकृत निवेदन काढून त्याच्या कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निवदेनानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांची पुनर्नियुक्ती १० डिसेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आली होती. मात्र शक्तिकांत दास पदावर कायम राहिल्यास देशातील अर्थव्यवस्था वाढीस लागण्यास मदत मिळू शकते. शक्तिकांत यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोना काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात आणि विकासाचं समर्थन करत बिकट परिस्थिती सुधारण्यास प्रयत्न केले होते.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धूरा देण्यात आली. दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून दास यांनी एमएची पदावी मिळवली आहे तर तामिळनाडू कॅडरचे ते आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आर्थिक प्रकरणातील सचिव म्हणून दास यांच्या भारतातील सर्वात शक्तिवान लोकांमध्ये गणले जाते.


 

First Published on: October 29, 2021 12:55 PM
Exit mobile version