राष्ट्रपतींनी देशातील 13 राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणाच्या खांद्यावर कोणत्या राज्याचा भार?

राष्ट्रपतींनी देशातील 13 राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणाच्या खांद्यावर कोणत्या राज्याचा भार?

नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी देशातील १३ राज्यांचे राज्यपाल (Governor) बदलले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केला असून राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित राज्यातील राज्यपाल आणि नायब राज्यपालांची बदली खालीलप्रमाणे.


कैवल्या त्रिविक्रम परनाईक यांची अरुणाचल प्रदेश; लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीम; सी.पी.राधाकृष्णन यांचा  झारखंड, शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेश; गुलाबचंद कटारिया यांची आसाम; माजी न्यायमूर्ती एस.अब्दुल नाझीर यांची आंध्र प्रदेश; आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिसवा भूषण हरिचंदन यांची छत्तीसगढ; छत्तीसगढचे राज्यपाल सुश्री अनुसुया युइके यांची मनिपूर; मनिपूरचे राज्यपाल ला.गणेसन यांची नागालँड; बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालय; हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहार येथे राज्यपालपदी बदली झाली आहे. तर, राधाकृष्ण माथूर यांचा लडाखच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारून तेथे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ. बी.डी.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या काळात राज्यपालांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लडाखचे नायब राज्यपाल आर.के.माथूर आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. लडाखमध्ये केंद्रविरोधी आंदोलन सुरू झाल्यामुळे आर.के.माथूर यांनी राजीनामा दिला तर, महाराष्ट्रात सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू होती त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात सुरू होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो मंजूर केला आहे.

First Published on: February 12, 2023 10:03 AM
Exit mobile version