Vaccines for children : केंद्राने सीरम इन्स्टिट्यूटला लहान मुलांवर चाचणी करण्यास दिली मंजुरी

Vaccines for children : केंद्राने सीरम इन्स्टिट्यूटला लहान मुलांवर चाचणी करण्यास दिली मंजुरी

कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

भारताच्या केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाने भारतातील सीरम इन्स्टिट्यूटच्या लहान मुलांवरील लसीच्या चाचणीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ७ ते ११ वयोगटातील मुलांवर लसीच्या चाचणी केली जाणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी सीरमची कोवोवॅक्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लाँच होणार आहे. ही लस १२ वर्षाखालील मुलांसाठी वापरली जाईल.

अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी अदार पूनावाला यांनी म्हटलं की, सीरमची कोवोवॅक्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लाँच होणार आहे. ही लस १२ वर्षावरील मुलांसाठी असेल. ही लस २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांसाठी लस लाँच होईल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने २ ते १७ वर्षापर्यंत मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी काही अटींसह परवानगी देण्याची शिफारस केली आहे. या चाचणीसाठी १० ठिकाणी २९० मुलांचा समावेश केला जाईल. ज्यात १२ ते १७ वयोगटातील आणि २ ते ११ वयोगटातील प्रत्येकी ४६० मुलांचा समावेश करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. यापूर्वी भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला कंपन्यांना मुलांवर लसीची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे.


 

First Published on: September 28, 2021 2:20 PM
Exit mobile version