DRDO Recruitment: सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

DRDO Recruitment: सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यादरम्यान अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसल्याने अनेक जण बेरोजगार झाले. दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, ही भरती पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाणून घ्या अधिक माहिती…

एकूण १५ पदांसाठी भरती

डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर २०२०अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख राहणार असून १३ नोव्हेंबर २०२० मुलाखतीची तारीख असणार आहे.

अशी असणार शैक्षणिक पात्रता

असा करा अर्ज

कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरतीची संधी दिली आहे. आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या https://www.drdo.gov.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


‘I feel better now, लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन’ – ट्रम्प

First Published on: October 4, 2020 5:34 PM
Exit mobile version