Russia-Ukraine War: Grammys स्टेजवर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी पाठिंब्यासाठी केली विनंती

Russia-Ukraine War: Grammys स्टेजवर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी पाठिंब्यासाठी केली विनंती

Russia-Ukraine War: Grammys स्टेजवर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी पाठिंब्यासाठी केली विनंती

रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्की (Ukraine President Volodymyr Zelensky’s) सातत्याने इतर देशांना पाठिंबा देण्यासाठी विनंती करत आहेत. ज्यावेळेस युद्धाला एक महिना पूर्ण झाला होता, त्यावेळेस झेलेंस्की यांनी संपूर्ण जगभरातील नागरिकांना रशियाविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. आता झेलेंस्की यांनी Grammys स्टेजवर कोणत्याही प्रकारे आम्हाला साथ द्या, पण कोणीही गप्प बसू नका, अशी विनंती जगाला केली आहे. स्टेजवरून एका व्हिडिओच्या माध्यमातून झेलेंस्कींनी ही विनंती केली. दरम्यान रविवार संयुक्त राज्य अमेरिकेतील ग्रॅमी अॅवार्ड्समध्ये एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि त्यामध्ये झेलेंस्की प्रेक्षकांना युक्रेनियनला पाठिंबा देण्याची विनंती करत होते.

माहितीनुसार, जॉन लीजेंड आणि युक्रेनचे कवि Lyuba Yakimchuck यांच्या सादरीकरणापूर्वी झेलेंस्की यांचा संदेश देणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘संगीताच्या विरुद्ध काय आहे? उद्ध्वस्त झालेली शहरे आणि मारले गेलेल्या लोकांची शांतता. तुमच्या संगीताने शांतता भरा. हे आजच करा, आमची कथा ऐकवण्यासाठी. कोणत्याही प्रकारे आम्हाला पाठिंबा द्या. परंतु कोणीही गप्प राहू नका.’ तसेच आणखीन बऱ्याच मुद्द्यावर झेलेंस्की यांनी भाष्य केले.

दरम्यान गेल्या ४० दिवसांनंतरही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या महाभियोजक यांनी दावा केला की, ‘कीव शहरातून आतापर्यंत रस्त्याच्या कडेला ४१० मृतदेह सापडले आहेत.’ त्यामुळे रशियन सैन्याने कीवमधून जाताना अनेक निष्पाप नागरिकांना बळी घेतल्याचे म्हटले जातेय. बुचामधील रस्त्यावर जागोजागी लोकांचा मृतदेह पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये काही जणांचे हात बांधले आहेत आणि काही जणांवर जवळून गोळ्या झाडल्या आहेत.


हेही वाचा – Ukraine Russia War : कीवमध्ये रशियन सैन्याने माजवला हाहाकार; रस्त्यांवर मृतदेहांचे खच, राष्ट्रपती झेलेन्स्कींचा नरसंहाराचा आरोप


 

First Published on: April 4, 2022 8:17 PM
Exit mobile version