Gujarat Election 2022 : निवडणुकीच्या प्रचारात सहभागी न केल्याची शशी थरूरांना खंत

Gujarat Election 2022 : निवडणुकीच्या प्रचारात सहभागी न केल्याची शशी थरूरांना खंत

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला नाही. त्यामुळे गुजरातच्या निकालावर बोलणे माझ्यासाठी कठीण आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केले. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर आहे. हा निकाल बघता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या यादीत नाव नसल्याने शशी थरूर यांना खंत वाट आहे. (Gujarat Election 2022 congress Shashi tharoor talk on Gujarat Election Results 2022)

संसदेचे अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनाला जाताना शशी थरूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुजरात विधानसभा निवडणूक आणि हिमाचर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, “ज्या नेत्यांनी जाऊन निवडणुकीचा प्रचार करावा अशी अपेक्षा होती, त्या यादीत मी नव्हतो. त्यामुळे गुजरातला न जाता गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत उत्तर देणे माझ्यासाठी कठीण आहे”.

शिवाय, शशी थरूर यांनी आम आदमी पक्षावरही भाष्य केले. आपनेही काही मते हिरावून घेतली आहेत. हिमाचलमधील काँग्रेसचा निकाल पाहाता भाजपाच्या विरोधातील सत्ताविरोधी पक्ष हिमाचलमध्ये काँग्रेससाठी काम करत आहेत. पण गुजरातमध्ये नाही.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या निकालानुसार भाजपा आघाडीवर असून, कॉग्रेस पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये भाजपा १५७ जागांवर आणि काँग्रेस १६ जागांवर पुढे आहे. त्यामुळे भाजपा बहुमताने विजयी होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि आप यांच्यात लढत सुरू आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांपैकी 150हून अधिक जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपाचा हा विजयी विक्रम केवळ पक्षासाठीच नाही तर राज्यासाठीही एक विक्रम आहे. विशेष म्हणजे या विजयासह भाजपाने 1985 मधील काँग्रेसचा 149 जागा जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.

गुजरात विधानसभा निवडणूक नेहमीच देशातील राजकारणाची दिशा ठरवते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस पार भूईसपाट झाल्याचं चित्र आहे.


हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपाचाच बोलबाला, विक्रमी बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस-आपचा सुपडा साफ

First Published on: December 8, 2022 3:49 PM
Exit mobile version