गुजरातच्या दाहोदमध्ये ३ फूट दिव्यांग महिलेने निरोगी चिमुकलीला दिला जन्म!

गुजरातच्या दाहोदमध्ये ३ फूट दिव्यांग महिलेने निरोगी चिमुकलीला दिला जन्म!

एकीकडे कोरोना महामारीच्या आजाराने दिवसेंदिवस कित्येकांना आपला जीव गमावावा लागत आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या दाहोदमध्ये एक निरोगी हसतमुख चिमुकली जन्माला आली आहे. ज्याची अपेक्षा फार कमी लोकांना होती. वैद्यकीय शास्त्राचा अभाव असल्याची घटना दाहोदमध्ये पाहायला मिळाली आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या अवघ्या तीन फूट उंचीच्या महिलेने निरोगी, सुदृढ मुलीला जन्म दिला आहे. या घटनेनंतर डॉक्टर देखील पाहून हैरान झाले आहे.

या महिलेचे नाव अंतराबेन डावर असे असून ती मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथील कोलाबईडा या गावातील रहिवासी आहे. तिचा पती एका पायाने अपंग आहे. एक छोटं किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह ते दोघं करतात. ३२ वर्षीय अंतराबेन गर्भवती होती, तेव्हा तिचे शेवटचे तीन महिने खूप कठीण होते. उंची कमी असल्याने आणि दिव्यांग असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

गरोदरपणात या महिलेला अनेक अडचणी आल्या तेव्हा अंतराबेनच्या पतीने तिला दाहोद येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पडवाल रूग्णालयातील डॉक्टर राहुल यांनी तपासणी केली असता ती महिला बेशुद्ध होती, तिची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली गेली होती आणि तिला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. कमी उंची असल्यामुळे तिचे गर्भाशय मोठे झाले होते आणि फुफ्फुस लहान होत गेले. परिस्थिती पाहता त्या महिलेला त्वरित व्हेंटिलेटरवर ठेऊन प्रसूतीची तयारी सुरू करण्यात आली. सामान्य प्रसूती करणं शक्य नसल्याने त्या महिलेचे सिजेरियन केले. त्यानंतर तिने एका निरोगी बालिकेला जन्म दिला असल्याची माहिती मिळतेय. या रूग्णालयातील डॉ. राहुल पडवळ म्हणाले की, अशा परिस्थितीत जेव्हा महिलेची उंची कमी असते, ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि ती महिला दिव्यांग असते, अशा परिस्थितीत महिला आणि बाळ दोघांनाही सुखरूप ठेवणे हे विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कारच असल्याचे त्यांनी सांगतिले.

First Published on: May 14, 2021 11:27 AM
Exit mobile version