गुजरातींचे दात ठरले सर्वात मजबूत

गुजरातींचे दात ठरले सर्वात मजबूत

गुजरातील लोकांचे दात मजबूत असतात

दात किडने, दात दुखणे, दात मजबूत नसणे त्यासोबत दात पडण्याच्या अनेकांना अशा समस्या भेडसावतात. यासंदर्भात देशातील एका संस्थेने अभ्यास केला आहे. यामधून देशातील गुजरातमधील लोकांचे दात सर्वात जास्त मजबूत असल्याचे समोर आले आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील लोकांपेक्षा गुजरातमधील लोकांचे दात सर्वात जास्त मजबूत असल्याचं या अभ्यासातून समोर आले आहे. गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीने (जीएफएसयू) भारतातील सर्व राज्यातील लोकांच्या दातावर अभ्यास केला. त्यामधून ही बाब समोर आली आहे.

कॅल्शिअमचे प्रमाण अधिक

या संस्थेने केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश, गुजरात या राज्याचा अभ्या केला. त्यांनी असे सांगितले आहे की, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील लोकांच्या दातांमध्ये कॅल्शियमचं जेवढं प्रमाण असतं, त्यापेक्षा अधिक कॅल्शियमचं प्रमाण गुजराती लोकांच्या दातांमध्ये असल्याचं आढळून आलं आहे. गुजरात आणि केरळमधील लोकांच्या दातांवर डाएटचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास देखील या संस्थेने केला. त्यावेळी गुजरातमधील लोकांच्या दातांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण ८२ टक्के असल्याचं आढळून आलं. तर केरळमधील लोकांच्या दातांमध्ये ८० टक्के कॅल्शियमचं प्रमाण आढळून आलं असल्याचे जीएफएसयूचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश बाबू यांनी सांगितलं.

स्ट्रॉन्शियमनचे प्रमाणही अधिक

गुजरातमधील जनता जास्त करुन शाकाहाराचे सेवन करतात. त्याचसोबत दुग्धजन्य पदार्थही जास्त खातात. शाकाहारी असल्यामुळे गुजराती लोकांच्या दातांमध्ये झिंक आणि फस्फरसचे प्रमाण क्रमश: ०.१४ टक्के आणि १७.३ टक्के आढळून आलं आहे. तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील लोकांच्या दातांमध्ये झिंक आणि फॉस्फरसचं प्रमाण ०.२३ टक्के आणि १८.५ टक्के एवढं असल्याचंही या अभ्यासातून दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे गुजराती लोकांच्या दातांमध्ये स्ट्रॉन्शियमनचे प्रमाणही अधिक असते हे या संशोधनातून दिसून आले.

First Published on: December 18, 2018 7:19 PM
Exit mobile version