मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला विमानतळावरून अटक!

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला विमानतळावरून अटक!

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसाला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही अटक केली आहे. दुबईला निघालेल्या मुसाला रविवारी पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचून अटक केली. मुसाकडून यावेळी पाकिस्तानी पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये मुसाचा समावेश होता. गुजरात एटीएसचे उपअधीक्षक के. के. पटेल यांनी माध्यमांना ही माहिती दिली. मुसाकडून मुंबई बॉम्बस्फोटातले महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलीस मुसाच्या शोधात होते.

मुंबई बॉम्बस्फोटांनंतर मुसा देश सोडून दक्षिण आफ्रिकेत पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी २०१९मध्ये गुजरातमध्ये किनारी भागात ड्ग्जची तस्करी झाल्याच्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते.

First Published on: February 10, 2020 7:55 PM
Exit mobile version