ओबामा, नेतान्याहू, बिल गेट्स, Appleसह अनेक अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक

ओबामा, नेतान्याहू, बिल गेट्स, Appleसह अनेक अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक

हॅकर्सनी जगातील अव्वल नेते, प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध व्यापारी आणि कंपन्यांची ट्विटर अकाउंट हॅक केली आहेत. यामध्ये अमेरिकेची अनेक हाय प्रोफाइल ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आली आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, अमेरिकेतील रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेतील नेते जो बिडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, वॉरेन बफे, Apple, उबर आणि इतरांची ट्विटर अकाउंट हॅक झाली आहेत.

हॅकर्स त्यांच्या अकाऊंटवरून ट्वीट करुन बिटकॉइन मागत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हॅकर्सनी ट्विट केलं की, “प्रत्येकजण मला परत देण्यास सांगत आहे आणि आता वेळ आली आहे. मी पुढील ३० मिनिटांमध्ये बीटीसी पत्त्यावर पाठविलेली सर्व पेमेंट दुप्पट करीत आहे. तुम्ही एक हजार डॉलर्स पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स परत पाठवीन.” पोस्ट केल्याच्या काही मिनिटांतच ही ट्वीटही हटविण्यात आली आहेत. मात्र या सुप्रसिद्ध व्यक्तिंच्या ट्विटर अकाऊंटला लक्ष्य कोणी केले हे अद्याप कळू शकलेलं नाही.

या घटनेनंतर ट्विटरने म्हटलं आहे की आम्हाला ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती आहे. आम्ही सध्या या प्रकरणाचा तपास करत आहोत. सोबतच हे दुरुस्त करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही लवकरच सर्वांना अपडेट देऊ.

ही हाय प्रोफाइल ट्विटर अकाउंट झाली हॅक 

First Published on: July 16, 2020 7:17 AM
Exit mobile version