ऑपरेशनदरम्यान पेशंटने केले हनुमान चालीसाचे पठण

ऑपरेशनदरम्यान पेशंटने केले हनुमान चालीसाचे पठण

प्रातिनिधिक फोटो

ऑपरेशनला घाबरणाऱ्या एका रुग्णाने ऑपरेशन दरम्यान हनुमान चालीसा म्हटल्याची घटना जयपूर येथील एका रुग्णालयात घडली आहे. या ३० वर्षीय रुग्णाच्या मेंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशन दरम्यान याला बेशुद्ध करण्यात आले नव्हते. ऑपरेशन थेटरमधली अशा प्रकारची पहिली घटना आहे. या रुग्णाच्या ब्रेन ट्युमरवर सर्जरी होत असताना ही घटना घडली. या ऑपरेशनला “अवेक सर्जरी” असेही म्हणतात. हे ऑपरेशन यशस्वी झाले असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णाला ७२ तासानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

पुन्हा पुन्हा येत होती आकडी

ही सर्जरी करणारे डॉ. के. के. बंसल यांनी दिलेल्या महितीनुसार या रुग्णाला मागील काही महिन्यांपासून आकडीचा त्रास होता. रुग्णाला आकडी येण्याचे कारण डॉक्टरांना समज नव्हते. त्याचे संपूर्ण शरीर तपासण्यात आले मात्र तरीही कारण स्पष्ट होत नव्हते. अखेर डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूचे सीटीस्कॅन केले असता त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी या रुग्णाचे ऑपरेश करण्याचा निर्णय घेतला.

ऑपरेशनची वाटत होती भिती

ब्रेनचे ऑपरेशन हे प्रंचड नाजूक असल्याने यात जीवही जाण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान या रुग्णाचे ऑपरेशन साठी डॉक्टरांनी तयारी केली. या रुग्णाला ग्रेड २ चा ट्युमर होता. हा ट्युमर रुग्णाच्या बोलण्याच्या जागेवर झाला होता. ऑपरेशन जर अयशस्वी झाले असते तर या रुग्णाची बोलण्याची क्षमता नाहीशी झाली असती. आपल्याला बोलण्याची शक्ती हरवायची नसल्यामुळे त्याचे अवेक ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये रुग्णाला शुद्धीवर ठेवण्यात येते. त्याने ऑपरेशन दरम्यान हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली. ऑपरेशन दरम्यान हा रुग्ण हनुमान चालीसा वाचत होता असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हनुमानने प्राण वाचवले

ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांनी प्रतिक्रिया देतांना देवाचे आभार मानले आहेत. “मला सतत आकडी येत असल्याने मला त्रास होत होता. यावर उपाय म्हणून ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर मला भिती वाटली. हनुमानजीवर माझा विश्वास असल्यामुळे माझ्या वरील हे संकट हनुमानजीच दुर करतील असे मला वाटले. म्हणून ऑपरेशनच्या वेळेस मी हनुचालीसा म्हणत होतो.” – रुग्ण

 

First Published on: December 28, 2018 4:28 PM
Exit mobile version