हनुमान जैन होते!

हनुमान जैन होते!

पुजारी आचार्य निर्भर सागर

देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणूकांच्या पर्श्वभूमिवर आता जाती वरून राजकारण होतांनाच्या घटना आपण चित्रपटात नेहेमीच बघतो. मात्र निवडणुकाजवळ आल्यावर असे मुद्दे जनतेसमोर उचलल्या जातांनेचे दिसून येत आहे. यामुद्यांमध्ये आता देवांचाही समावेश करण्यात आला आहे. हनुमान यांच्या जातीवरुन देशभरात वक्तव्य केले जात आहे. हनुमान है जैन असल्याचा दावा भोपाळ येथील पुजाऱ्यांनी केला आहे. आचार्य निर्भय सागर यांनी हा दावा केला आहे. या पूर्वी हनुमान हे दलित आणि मागासवर्गीय असल्याचा दावा करण्यात येत होता. हनुमान यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर हनुमान हे नक्की कोणत्या धर्माचे किंवा जातीचे आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हनुमान

काय म्हणाले निर्भय सागर

जैन धर्मात १७९ महापुरुषांचा उल्लेख केला आहे. यामध्ये २४ कामदेवांबद्दल सांगितले आहे. या २४ महापुरुषांमध्ये क्षत्रियांचाही समावेश होता. हनुमान हे क्षत्रिय होते. क्षत्रिय असल्याने त्यांनी लोकांची रक्षा केली. राम यांच्याबरोबर राहूनही त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते. नंतर त्यांनी तपस्या केली आणि ज्ञान प्राप्त केले. लोकांनी त्यांच्या जातीवरून राजकारण करु नये अशी मी विनंती करतो.- पुजारी आचार्य निर्भर सागर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता दावा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत हनुमान हे दलित आदिवासी होते असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान हे दलित नाही तर अधिवासी होते असे विधान केले आहे. दरम्यान या विधानावरुन योगी यांना ब्राह्मण सभेने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर साय यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हनुमान यांच्या जातीचा विषय आणखी वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता आहे.

हनुमानांविषयी योगी असे का म्हणाले?

राजस्थानच्या अलवरमध्ये दलित आदिवासी समाज जास्त आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित आदिवासी होते असे म्हटले होते. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, भगवान हनुमान हे दलित आदिवासी आणि वनवासी होते. बजरंगबलींनी भारतीय समाजाला पुर्वेपासून पाश्चिम आणि उत्तरेपासून दक्षिणपर्यंतच्या जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. भारतीय समाजाला एकत्र जोडण्याची इच्छा ही प्रभू रामचंद्रांची होती. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्याचे काम बजरंगबलींनी केले, आपणही ही इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. त्याचबरोबर योगी यांनी भगवान हनुमानच्या जातीच्या मतदारांना भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे आणि रावणभक्तांनी कॉंग्रेसला मतदान करावे, असे योगी आदित्यनाथ म्हटले होते.

First Published on: December 3, 2018 9:13 AM
Exit mobile version