गंभीरच्या मैत्रीसाठी धावून आले हरभजन आणि लक्ष्मण

गंभीरच्या मैत्रीसाठी धावून आले हरभजन आणि लक्ष्मण

गंभीरने सुनावले सैनीच्या विरोधकांना खडे बोल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरच्या संदर्भात राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. गंभीरने काही दिवसांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला असून भाजपकडून त्याला पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात गंभीरच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या (आप) आतिशी मार्लेना उमेदवारी लढत आहे. दिल्लीत आपचे चांगले प्रभुत्व आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनामध्ये चुरशीची लढत आहे. दरम्यान, या मतदारसंघात कोणीतरी आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबाबत आक्षेपार्य मजकूराचे पत्रके छापून वाटली आहेत. या मतदारसंघात आतिशी यांची लढाई गंभीर यांच्यासोबतच असल्यामुळे त्यांनी गंभीर यांच्याकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान गंभीरचे क्रिकेट संघातील मित्र हरभजन सिंह आणि आर. लक्ष्मण यांनी गंभीरची पाठराखण केले आहे.

काय म्हणाला हरभजन सिंह?

हरभजन सिंह आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन गौतम गंभीरला पाठिंबा दिला आहे. हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गौतम गंभीरचे असे काही प्रकरण ऐकूण मला धक्काच बसला. मी त्याला चांगला ओळखतो. तो महिलांविषयी असे चुकीचे कधीही वागू शकत नाही. निवडणूक जिंको किंवा त्यात त्याचा पराभव होवो, एक माणूस म्हणून तो फार चांगला आहे.

काय म्हणाला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण?

माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने म्हटले आहे की, ही घटना ऐकल्यानंतर मी सतब्ध झालो. गौतमला मी दोन दशकांपासून ओळखतो. त्याच्या मनात महिलांबाबत आदर आहे. त्याच्या प्रामाणिकपणाची मी खात्री देऊ शकतो.

First Published on: May 10, 2019 3:59 PM
Exit mobile version