Covid-19 : आता एसीमुळे पसरणारे कोरोना विषाणु होणार निष्क्रिय, CSIR शोधले नवे तंत्र

Covid-19 : आता एसीमुळे पसरणारे कोरोना विषाणु होणार निष्क्रिय, CSIR शोधले नवे तंत्र

Covid-19 : आता एसीमुळे पसरणारे कोरोना विषाणु होणार निष्क्रिय, CSIR शोधले नवे तंत्र

कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गात अनेकदा एसीचा वापर करुन नका असे आवाहन केले जात होते. कारण एसीच्या हवेतून कोरोना विषाणु सर्वाधिक पसरतो असे म्हटले जात होते. परंतु आता एसीद्वारे पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला घाबरण्याची गरज नाही. कारण वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या ( CSIR) संशोधकांनी आता असे एक तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यातून एसीद्वारे हवेत पसरणारे कोरोना विषाणुचे संक्रमण ९९. ९ टक्के नष्ट केले जाऊ शकते. या तंत्रावर सीएसआयआरच्या केंद्रीय वैज्ञानिक इंस्ट्रुमेंटेशन ऑर्गनायझेशन (सीएसआयओ), सुक्ष्मजीव प्रौद्योगिक संस्था (इमटेक) चंदीगड आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीबीआरआय) रुर्की यांनी संयुक्तपणे या संशोधनावर काम केले.

हवेतच कोरोना विषाणू नष्ट करणारे स्वदेशी तंत्र

देश-विदेशातील वैज्ञानिक कोरोना विषाणूसंदर्भात सर्व प्रकारच्या संशोधन कार्यात गुंतले आहेत. या संशोधनात असेही समोर आले आहे की, कोरोना विषाणू हवेतूनही पसरू शकतो. याशिवाय एसीच्या हवेतूनही कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा परिस्थितीत सीएसआयआरच्या विविध संस्थांमधील वैज्ञानिकांनी संयुक्तपणे अल्ट्रा व्हायलेट-सी (युव्ही-सी) डिसइंफेक्टिव टेक्नोलॉजी विकसित केली आहे. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची वेब लेंथ २४० ते २८० नॅनोमीटर आहे. या डिसइंफेक्टिव तंत्राचा उपयोग मोठ्या संस्थेचे सभागृह, मॉल, मोठ्या इमापतींमध्ये जेथे एअर हँडलिंग युनिट (एएचयू) असून नलिकाद्वारे हवा दिली जाते. तेथे केला जाऊ शकतो.

९९.९ टक्के व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशीप्रकाराला करणार नष्ट

य तंत्रज्ञानाबद्दल सीबीआरआयचे रुर्कीचे आर्किटेक्चर अँड प्लानिंग विभागाचे विभागाध्यक्ष आणि प्रमुख वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार सांगतात, हे तंत्र सीएसआयआर इन्स्टिट्यूटच्या सीएसआयओ चंदीगडने विकसित केले आहे. तर इमटेक चंदीगडच्या बायोसॅफ्टी लेव्हल 3 प्रयोगशाळेत त्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी असे आढळले की, हे तंत्र ९९.९ टक्के व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर प्रकारचे व्हायरस आणि एरोसोलला निष्क्रिय करते. याद्वारे, विषाणूच्या डीएनए आणि आरएनएवर हल्ला केला जातो. इमटेक चंदीगडच्यावतीने या तंत्रज्ञानाच्या यशाची चाचणीनंतर इमारतींच्या सभागृहात वापरण्यापूर्वी त्याचे सीबीआरआय रुर्कीच्या प्रयोगशाळेत टेस्ट बेड विकसित करण्यात आले.

डिझाइन आणि प्लेसमेंटनंतर हे तंत्रज्ञान वापरले

डॉ.अशोक कुमार म्हणाले की, दिल्लीतील सीएसआयआर मुख्यालय इमारतीच्या सभागृहात सुरुवातीला हे तंत्र वापरले गेले. या सभागृहाची क्षमता २५० ते ३०० व्यक्तींपर्यंत आहे. या व्यतिरिक्त अन्य सीएसआयआर संस्थांचे सभागृह, मोठे कॉन्फरन्स हॉलमध्ये हे तंत्र वापरले जात आहे. सीएसआयओ चंदीगड आणि सीबीआरआय रुर्की डिझाइन आणि प्लेसमेंटवर काम करून हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. देशभरात या तंत्राच्या विक्रीसाठी आत्तापर्यंत ३० विक्रेत्यांशी चर्चा सुरु आहे. जगभरात सिद्ध झाले आहे की युवी-सी हवेचे निर्जंतुकीकरण करत घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे एक प्रभावी तंत्र आहे.


 

First Published on: June 8, 2021 9:10 AM
Exit mobile version