भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार!

भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार!

बाबा अमरपुरी (सौजन्य एएनआय)

विज्ञानाचा जगभर कितीही प्रसार झाला असला तरीही भारतात लोक आजही भोंदू बाबांच्या नादी लागतात. देशातली अंधश्रद्धा कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लोकांच्या याच भोळेपणाचा फायदा काही भोंदूबाबा नेहमीच घेत असतात. आसाराम बापू आणि अनेक भोंदू बाबांवर अतापर्यंत बलात्काराचे, फसवणुकीचे, चोरीचे, दरोड्यांचे गुन्हे सिद्ध झाले आहेत. तरीही लोक सुधारत नसल्याचे पाहायला मिळत आहे. भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून सुमारे १२० महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरयाणामधील टोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिरात पुजारी असलेल्या अमरपुरी ऊर्फ बिल्लू बाबा असे त्याचे नाव आहे. त्याचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास केला. तपासादरम्यान या भोंदू बाबाने सुमारे १२० महिलांसोबत शारीरिक संबंध बनवल्याचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. या बाबाने विविध महिलांसोबत बलात्कार केला आणि त्यादरम्यानचे व्हिडिओदेखील शूट केले आहेत.

प्रेमबाधा झाल्याचं सांगून फसवणूक

अमरपुरी ऊर्फ बिल्लू हा भोंदू त्याच्याकडे विविध समस्या घेऊन आलेल्या महिलांना ‘तुम्हाला प्रेमबाधा झाली आहे’ असे सांगायचा. ‘मी तुम्हाला या त्रासातून मुक्त करतो’, असे सांगून या महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर तंत्रमंत्रांच्या बहाण्याने तो महिलांना बेशुद्ध करणारे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार करत होता. यादरम्यान, तो करत असलेल्या कृत्याचे शुटिंगदेखील करत होता. त्यानंतर ‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन’, अशी धमकी देऊन तो या महिलांना ब्लॅकमेल करायचा. त्याबदल्यात हा भोंदू महिलांकडून पैसे उकळू लागला. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार करत होता.

जिलेबीवाला बनला बाबा!

पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. हा भोंदू बाबा पूर्वी जिलेबी विकायचा. त्याचे खरे नाव अमरवीर आहे. २० वर्षांपूर्वी पंजाबमधील मानसा येथून तो हरयाणातील टोहाणा येथे आला.

First Published on: July 21, 2018 3:22 PM
Exit mobile version