Covid-19 Third Wave: दिलासादायक! तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार नाही – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Covid-19 Third Wave: दिलासादायक! तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार नाही – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Covid-19 Third Wave: दिलासादायक! तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता पसरली आहे. पण आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत दिलासादायक बाब सांगण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना जास्त प्रभावित करणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज, बुधवारी सांगण्यात आले आहे.

कोरोना दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षात जास्त घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. या लाटेदरम्यान अनेक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे पाहायला मिळाले. पण आता येणारी तिसरी लाट ही लहान मुलांना अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाची येणारी लाट मुलांना जास्त प्रभावित करणार नाही. ज्या मुलांना कोरोना होतो, ती मुलं जास्त करून असिमन्टमॅटिक असतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये संक्रमणाची लक्षणे खूप कमी असतात.

मंत्रालयाने पुढे दिलेल्या माहितीनुसार, बाधित झालेल्या खूप कमी मुलांना आता रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. जर पूर्णपणे निरोगी मुलांना संसर्ग झाला तर त्यांची थोडीशी तब्येत खराब होते आणि ते रुग्णालयात न जात पटकन बरे होतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ज्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली होती. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

दरम्यान भारत किंवा पूर्ण जगात असा कोणताही डेटा उपलब्ध नाही आहे, ज्यामध्ये लहान मुलांमध्ये संक्रमण गंभीर स्वरुपात पसरले आहे, असे नोंदवले आहे. सरकारच्या वतीने असे म्हटले की, मुलांची काळजी पाहता आरोग्याच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. या संसर्गामुळे संक्रमित मुलांची काळजी व उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार, कोव्हॅक्सिनची चाचणी २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर सुरू केली गेली आहे.

First Published on: June 30, 2021 7:26 PM
Exit mobile version