…आणि गृहमंत्री पुरात अडकले, हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू

…आणि गृहमंत्री पुरात अडकले, हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू

...आणि गृहमंत्री पुरात अडकले, हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू

मध्यप्रदेशमध्ये पूरग्रस्त भागात नागरिकांची मदत करण्यासाठी गृहमंत्री बोटीने गेले होते. मात्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि परिस्थिती बिघडल्यामुळे गृहमंत्र्यांनाच हेलिकॉप्टरने वाचवण्यात आलं आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा दातिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेत होते. पूरग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी बोटीने गृहमंत्री गेले होते. मात्र परिस्थिती बिघडल्याने गृहमंत्री स्वतःच पुरात अडकले होते. गृहमंत्र्यांना रेस्क्यू करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंडियन एयरफोर्सच्या हेलिकॉप्टरने गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशमधील काही जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. नागरिकांचे स्थलांतर आणि बचावकार्य सुरु आहे. याचा आढावा घेण्यासाठी आणि बाचाव करण्यासाठी दातिया जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात गेले होते. गृहमंत्र्यांना माहिती मिळाली होती की, पूरग्रस्त भागातील मारुनेद गावात काही नागरिक घरांवर अडकले आहेत. यामुळे मंत्री नरोत्तम मिश्रा एसडीआरएफची बोट घेऊन पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी निघाले होते. बोटीने जाताना अचानक एक झाड मंत्र्यांच्या बोटीवर कोसळते यामुळे बोट पुरातच अडकते.

मंत्र्यांची बोट पुरामध्ये अडकल्यावर स्वतःच शासकीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. शाकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनंतर गृहमंत्र्याच्या मदतीसाठी भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. हेलिकॉप्टरच्या मदतीने गृहमंत्री आणि बाकीच्या ९ लोकांचा बचाव करण्यात आला आहे

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. दातिया जिल्ह्यातील २ पुल पुरामुळे वाहून गेले आहेत. तर राष्ट्रीय महामार्ग ३ वरील एका पुलाला तडा गेला असल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये १२०० गावे पुरपरिस्थितीमुळे प्रभावित झाली आहेत. एकूण ५ हजार ९५० नागरिकांसुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि बीएसएफ तैनात करण्यात आले आहेत. अजूनही २ हजार लोकं पूरग्रस्त भागात फसले असल्याचे सांगण्यात येत आहे.

First Published on: August 5, 2021 9:51 AM
Exit mobile version