देशात २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकूण बाधितांची संख्या चार लाख पार!

देशात २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकूण बाधितांची संख्या चार लाख पार!

देशात २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकूण बाधितांची संख्या चार लाख पार!

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात सर्वाधिक १५ हजार ४१३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३०६ जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यामुळे देशांतील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा पार केला असून आतापर्यंत भारतात एकूण ४ लाख १० हजार ४६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ६९ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख २६ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

१ ते २० जून दरम्यान दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

देशभरात १ जूनपासून ते २० जून दरम्यान दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित संख्या १ लाख २८ हजार २०५, तामिळनाडू, ५६ हजार ८४५, दिल्ली ५६ हजार ७४६, गुजरात २६ हजार ७३७, उत्तर प्रदेश १७ हजार १३५वर पोहोचली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. एकट्या मुंबईत ६४ हजार १३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

First Published on: June 21, 2020 10:30 AM
Exit mobile version