Karnataka Hijab Row : ‘अल्ला हु अकबर’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस

Karnataka Hijab Row : ‘अल्ला हु अकबर’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस

Karnataka Hijab Row : 'अल्ला हु अकबर'चा नारा देणाऱ्या 'त्या' विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस

कर्नाटकात हिजाब परिधान करण्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले असून मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु झाली. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एका बाजूला अनेक विद्यार्थी ‘जय श्री रामचा नारा’ देतायत तर या जमावासमोर एक हिजाब परिधान केलेली विद्यार्थीनी ‘अल्ला हु अकबर’चा नारा देत आहे. अंगावर भगवी शाल आणि हातात भगवे झेंडे घेऊन  विरोध करणाऱ्या जमावाला हिजाब परिधान केलेली विद्यार्थीनी एकटी सामोरी जाते. मात्र एवढ्या मोठ्या जमावाला एकटीने सामोरे जाणाऱ्या मुस्कान या विद्यार्थीनीच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्या विद्यार्थिनीचे कौतुक करत तिला शूर असल्याचे म्हटले आहे. तर जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने त्या विद्यार्थीनीला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष हजरत मौलाना महमूद असद मदनी यांनी मुस्कान खान या विद्यार्थीनीचे अभिनंदन करत तिला 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने जारी केलेल्या निवेदनानुसार मौलाना मदनी यांनी म्हटले आहे की, मुस्कानने आपल्या घटनात्मक आणि धार्मिक हक्कांसाठी विरोधकांना धैर्याने लढा दिला. उडुपी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात शिक्षण घेणारी मोहम्मद हुसेन खान यांची कन्या बीबी मुस्कान खान या धाडसी विद्यार्थिनीला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

ओवेसी म्हणाले, ‘धाडसी’

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्कानला धाडसी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, मी मुलीच्या पालकांना सलाम करतो. या मुलीने एक आदर्श ठेवला आहे. त्या मुलीने अनेक दुर्बल लोकांना संदेश दिला आहे. मुलीने जे काम केले ते मोठे धाडसाचे काम होते. मुलीने एक उदाहरण सिद्ध केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

कर्नाटकात हिजाबचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. जानेवारीमध्ये उडुपीच्या प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याने त्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर या मुली वर्गासमोरच बसल्या. या प्रकरणी उडुपी येथील रेश्मा या विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली आहे. यावर कोर्ट सुनावणी करत आहे. मंगळवारी सुनावणी झाली असून, बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.


 

First Published on: February 9, 2022 11:45 AM
Exit mobile version