हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘डॉक्टर’ म्होरक्याचा खात्मा! CRPF-पोलिसांचं मोठं यश!

हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘डॉक्टर’ म्होरक्याचा खात्मा! CRPF-पोलिसांचं मोठं यश!

दहशतीचा डॉक्टर म्हणून कुप्रसिद्ध असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर सैफुल्लाह मीरला जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जॉइंट ऑपरेशनमध्ये कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. काश्मीरचेच पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर डॉ. रियाज नायकू याचा खात्मा झाल्यानंतर सैफुल्लाहला हिजबुलचा कमांडर बनवण्यात आलं होतं. मात्र, आजच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. त्यासोबतच त्याच्या एका साथीदाराला देखील जिवंत पकडण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचं नेटवर्क मजबूत असून जो कुणी इथे येईल, तो मारला जाईल, असं देखील विजय कुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सैफुल्लाह हा देखील रियाज नायकूसारखाच क्रूर दहशतवादी होता. लष्कराच्या हिट लिस्टमध्ये देखील त्याला A++ कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं होतं. सैफुल्लाहनं मेडिकलचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळेच त्याला दहशतीचा डॉक्टर असं देखील म्हटलं जात होतं.

First Published on: November 1, 2020 7:17 PM
Exit mobile version