Corona: ‘कोरोनावर भारताच्या प्रयत्नांचे जगभर कौतुक; मात्र काँग्रेसकडून राजकारण’

Corona: ‘कोरोनावर भारताच्या प्रयत्नांचे जगभर कौतुक; मात्र काँग्रेसकडून राजकारण’

देशातील वाढत्या कोरोना विषाणूंमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला जनतेची दिशाभूल थांबवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी १३० कोटी भारतीय एकत्रित झाले आहेत. असे असले तरी काँग्रेस क्षुल्लक राजकारण करत आहे. अशावेळी त्यांनी राष्ट्रहिताचा विचार करून लोकांची दिशाभूल करणे थांबवावे, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या वक्तव्यावर शहांचे उत्तर 

कोरोना विषाणूमुळे देशभर लॉकडाऊनवर काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोना विषाणूचे संकट आरोग्य आणि मानवतावादावर संकट असल्याचे वर्णन केले. आमच्यासमोर एक भयावह आव्हान आहे. परंतु त्यावर मात करण्याचा आपला संकल्प अधिक चांगला असणे अपेक्षित आहे. तसेच लॉकडाऊनमुळे लाखो गरीब कामगारांना त्रास सहन करावा लागला असल्याचे त्या म्हणाल्या. यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर प्रतिहल्ला केला.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. आता लॉकडाऊचा कालावधी संपत आला आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी नेमके कशी परिस्थिती ठेवावी याविषयी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे, असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा –

राज्यातलं लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने संपवा; पंतप्रधानांची सुचना

First Published on: April 2, 2020 9:55 PM
Exit mobile version