कोरोनातून बरे झाल्यावर किती दिवसात Corona लस घ्यावी? जाणून घ्या

कोरोनातून बरे झाल्यावर किती दिवसात Corona लस घ्यावी? जाणून घ्या

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र अद्याप कोरोना लसीकरणाबद्दल सामान्य नागरिकांसह कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्यासंदर्भातील अनेक शंका आहेत. सध्या देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लस काढल्या आहेत. या लसी शंभर टक्के प्रभावी नसल्या तरी कोरोनाशी सामना करण्यास सक्षम आहेत. भारतानेही कोविशील्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन लसी विकसित केल्या आहेत. मात्र लस घेण्यावरून सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना लस खरच प्रभावी आहे का? लस लावल्यानंतर कोरोना होणार नाही असे आहे का? अनेकांनी लस घेतल्यानंतरही कोरोना झाला, मग कोरोनाची लस का घ्यावी? अशा अनेक शंका सामान्य नागरिकांना असताना आता कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या मनात देखील कोरोनाची लस कधी घेतली पाहिजे? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाला आणि कोरोनाची लस घ्यायची आहे तर ती कधी घ्यायला हवी? पहिला डोस कधी घ्यायला हवा? पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायला हवा? यासारख्या काही प्रश्नांवर डॉ. प्रविण गुप्ता यांनी उत्तरं दिली आहेत. यावेळी डॉ. प्रविण गुप्ता यांनी कोरोनातून बरे झाल्यावर किती दिवसात Corona लस घ्यावी? कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोरोना लस घ्यायची असेल तर त्यांच्यातील कोरोनाची लक्षण पूर्णतः गेल्यानंतर ९० दिवसांनी कोरोनाची लस घ्यावी, असे सांगितले आहे.

कोरोना लसीबाबत अद्याप शंका आहे?

कोविड नंतर बनणाऱ्या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधीपर्यंत राहतात. म्हणून कोरोनाची लस बाधित रूग्णांनी घ्यावी.

कोविड होऊन गेल्यावर कमीत कमी ८ ते १२ आठवड्यांनी लस घ्यावी.

कोरोनामुळे शंभर लोकांमध्ये दोन ते चार जणांचा मृत्यू होत आहेत. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात एक इतके कमी प्रमाणात आहे. तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे आवश्यक आहे.

ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात. ते एक ते दोन दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे.

कोरोनाचा पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.

सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी. परंतु कॅन्सर आणि इतर कोणता आजार असल्यास फक्त आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसीकरण करून घ्यावे. तसेच हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड असणाऱ्या लोकांनी लस घेतली तरी चालेल. मात्र लस घेण्यापूर्वी या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्याने लसीकरण करावे.

First Published on: May 7, 2021 2:56 PM
Exit mobile version