तुमच्या मोबाईलवर देखील असू शकतात Covid-19चे विषाणू, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी करा फॉलो

तुमच्या मोबाईलवर देखील असू शकतात Covid-19चे विषाणू, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी करा फॉलो

तुमच्या मोबाईलवर देखील असू शकतात Covid-19चे विषाणू, सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी करा फॉलो

कोरोना व्हायरसचा (Cororna virus) कहर अद्याप टळलेला नाहीये. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी प्रत्येक देश लढत आहे. या महाभयंकर व्हायरसमुळे अतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला.(Cororna Virus In India) यासह लॉकडाऊनमुळे (India Lockdown) अर्थव्यवस्थेलाही तडा गेला आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Cororna Third Wave In India) सामना प्रत्येक देश करत आहे. मात्र तिसऱ्या लाटेदरम्यान मृत्यूमुखी होण्याची संख्या जास्त नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीत वाढ होऊन काहीश्या प्रमाणात कोरोना व्हायरस रोखण्यात यश आले आहे असं म्हणायला हरकत नाही. तसेच सरकारने लागू केलेले नियम व अटींचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळते. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने कोरोना पुन्हा होऊ शकतो असे सांगितले जात आहे. दरम्यान कोरोनाची लागण होण्याची अनेक कारणे आहेत.(How To Sanitize Smartphone To Corona Virus)

आपण नेहमी घराबाहेर पडताना मोबाईल जवळ बाळगत असतो. प्रत्येक ठिकणी आपल्याला मोबाईलची गरज भासत असते मात्र तुम्हाला माहीतीये का, की कोरोना व्हयरस हा मोबाईलच्या माध्यमातूनही पसरू शकतो. अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल कोरोना व्हायरस पासून कशा प्रकारे सुरक्षित ठेवाल जाणून घ्या.

कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर देखील असू शकतो.

घराबाहेर पडल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची प्रचंड शक्यता वर्तवण्यात येते. यासह बाहेर गेल्यावर देखील सतत मोबाईलचा वापर करत असाल तर वेळीच सावधानता बाळगा वेळोवेळी मोबाईल सॅनिटाइज करत राहा.

मोबाईलला सॅनिटाइज करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

मोबाईल योग्य प्रकारे सॅनिटाइज करण्यासाठी सर्वात पहिले लिंट फ्री माइक्रोफाइबर कपड्याचा वापर करा. यामुळे तुमच्या फोनवर स्क्रॅच पडणार नाही तसेच मोबाईल सॅनिटाइज करताना मोबाईलवर डायरेक्ट सॅनिटाइजर शिंपडू नका यामुळे तुमच्या मोबाईलची स्क्रिन खराब होण्याची शक्यता जास्त असते.

मोबाईल सॅनिटाइज करण्याची योग्य पद्धत

मोबाईल सॅनिटाइज करण्यापूर्वी फोन बंद करा. तसेच लिंट फ्री माइक्रोफाइबर कपड्याने व्यवस्थित मोबाईल स्क्रिन साफ करा. मोबाईलला डिसइन्फेक्ट करतेवेळी मोबाईलचा कव्हर देखील काढून ठेवा कोरोना व्हायरस मोबाईलच्या कव्हरमध्ये जाण्याची देखील जाऊ शकतो.


हे हि वाचा – Omicron Variant: डोळ्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग

First Published on: January 23, 2022 6:02 PM
Exit mobile version