लेबनानची राजधानी बेरूतमध्ये स्फोट; स्फोटाचा भीषण व्हिडिओ व्हायरल

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये स्फोट; स्फोटाचा भीषण व्हिडिओ व्हायरल

लेबनानची राजाधानी बेरूतमध्ये आज दोन भयंकर स्फोट झाले. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात शेकडो लोक जखमी झालेले आहेत. या भीषण स्फोटामुळे बेरूतच्या शहरावर अचानक धुराचे लोळ दिसून लागले. प्राथमिक माहितीनुसार हे स्फोट बंदर क्षेत्रात झाले, जिथे खूप गोदाम होते. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाने पुर्ण शहर हादरून गेले.

 

या स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. लेबनानचे आरोग्य मंत्री हमद हसन यांनी सांगितले की, या स्फोटात राजधानीतील शेकडो लोक जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटात आजूबाजूच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. लोकांनी तर हा अणुबॉम्बचा स्फोट असल्याचा अंदाज लावला होता.

 

First Published on: August 4, 2020 11:36 PM
Exit mobile version