केरळ पोलिसांच्या ताफ्यात आता रोबो पोलीस

केरळ पोलिसांच्या ताफ्यात आता रोबो पोलीस

केरळ पोलिसांच्या ताफ्यात आता रोबो पोलीस

केरळ पोलिसांच्या ताफ्यात आता रोबो पोलीस आले आहेत. त्यामुळे आता केरळ पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे. हे रोबो पोलीस थिरुवनंथपुरमच्या पोलीस स्थानकात मंगळवार पासून दाखल झाले आहेत. मंगळवारी या संदर्भातच एक कार्यक्रम थिरुवनंथपुरम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केरळते मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या रोबो पोलिसांची सुरुवात करण्यात आली आहे. KP-BOT असे या रोबो पोलीसचे नाव आहे. हे रोबो पोलीस फार महत्त्वाचे फार महत्त्वाचे कामे करणार आहेत.

चार पोलीस कर्मचाऱ्यांची कामे करेल एकटा रोबो पोलीस

थिरुवनंथपुरम पोलीस स्थानकात कुणी तक्रार घेऊन आले तर त्या गृहस्थाची तक्रार नोंदवण्याचे काम आता हे रोबो पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शनदेखील हे रोबो पोलीस करणार आहेत. तक्रारदार आणि पोलीस अधिकारी यांच्यातील दुवा हा रोबो पोलीस होणार आहे. तो सर्व तक्रारदारांची माहिती ठेवणार आहे. त्याचबरोबर नियुक्तीचा संपूर्ण डेटा तो ठेवणार आहे. तक्रारदाराची आणि गुन्हेगाराची संपूर्ण माहिती हा रोबो पोलीस ठेवणार आहे. ऑफीसमधील बरीच कामं हा रोबो पोलीस हाताळणार आहे. ‘ज्या ठिकाणी चार पोलीस कामे करतात, त्याठिकाणी एकटा रोबो पोलीस सर्व चौघांची कामे हाताळणार आहे’, असे केरळेचे पोलीस महासंचालक म्हटले आहेत.

कल्पना वास्तवात साकारली

विज्ञान आणि तंत्रज्ञान काय प्रगती होईल, हे सांगता येणार नाही. पुर्वीच्या काळी मोबाईल फोन, व्हिडिओ कॉल या सगळ्या गोष्टी काल्पनीक वाटत असायच्या. मात्र, विज्ञानात प्रगती झाली आणि कल्पनातील फोन वास्तवात साकारले गेले. आता अशीच एक नवी कल्पना वास्तवात साकारली आहे. ती म्हणजे रोबो पोलीसची. ही संकल्पना यशस्वी ठरेल? हे पाहणं महत्त्वाचे आहे.

First Published on: February 20, 2019 9:50 AM
Exit mobile version