पत्नीला दाढी आल्यामुळे पतीने मागितला घटस्फोट

पत्नीला दाढी आल्यामुळे पतीने मागितला घटस्फोट

(फोटो प्रातिनिधिक आहे)

आजकाल अजब गोष्टींमुळे घटस्फोट घेतला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. असाच घटस्फोट अहमदाबाद न्यायालयामध्ये एका पतीने अजब गोष्टीकरता पत्नीकडे मागितला असल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला दाढी आणि तिचा आवाज पुरुषांसारखा असल्याने पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र अहमदाबाद न्यायालयाने पतीची मागणी फेटाळली आहे.

याचिकेमध्ये काय म्हटले आहे?

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी नवऱ्यामुलीने बुरखा घातला होता. त्यामुळे तिचा चेहरा पाहता आला नाही. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना कळले नाही. तिच्या कुटुंबीयांनीदेखील आम्हाला अंधारात ठेवून माझा आणि माझ्या कुटुंबाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप पतीने याचिकेत केला आहे.

घराबाहेर काढण्याचा पतीचा डाव

हार्मोन्ससंबंधीच्या कारणांमुळे माझ्या चेहऱ्यावर काही केस आले आहेत. मात्र यावर उपचार सुरु असून ते उपचारानंतर केस हटवले जाऊ शकतात. मात्र माझ्या पतीने माझ्यावर चुकीचे आरोप करुन मला घराबाहेर काढण्याचा हा डाव केला असल्याचा पत्नीचा आरोप आहे.

ही पहिली घटना नाही

यापूर्वी देखील अशी घटना घडल्याचे समोर आले होते. जून महिन्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दाढी आली असल्याच्या कारणामुळे पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. त्यामुळे ही पहिली घटना नसून याआधी देखील अशी घटना घडल्याने ही घटना दुसऱ्यांदा घडल्याचे समोर आले आहे.

First Published on: August 5, 2018 4:14 PM
Exit mobile version