2023 मध्ये भारतात सुरू होणार हायड्रोजन ट्रेन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

भुवनेश्वर – भारात हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या बनवत आहेत. या गाड्या 2023 पर्यंत तयार होणार आहेत. ओडिशातील भुवनेश्वर येथे SOA विद्यापीठात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. पुढे त्यांनी भारतीय रेल्वे गतिशक्ती टर्मिनल धोरणांतर्गत रेल्वे नेटवर्कद्वारे दुर्गम भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम वेगाने सुरू असल्याचेही सांगितले.

भारतात हाय – स्पीड वंदे भारत गाड्या स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्या आहेत. 2 वर्षापासून कोणत्याही मोठ्या समस्यांशिवाय धावत आहेत. आणखी वंदे भारत एक्सप्रेस गाड्या ICF मध्ये बनवल्या जात असून त्या लवकरच सेवेत आणल्या जातील. अलीकडेच वंदे भारत ट्रेनला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

आतापर्यंत फक्त जर्मनीने केले आहे उत्पादन –

आतापर्यंत फक्त जर्मनीत हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तयार केल्या जात आहेत. या वर्षी जर्मनीने हायट्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची पहिली बॅच सुरू केली आहे. फ्रेंच कंपनी Alstom ने 92 मिलियन डॉलर खर्चून 14 ट्रेन तयार केल्या आहेत.आतापर्यंत फक्त जर्मनीत हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तयार केल्या जात आहेत.

यापूर्वी रेल्वे आणि ट्रॅक व्यवस्थापनाबाबत आमचे लक्ष केवळ ट्रेन बनवण्यावर नाही. आम्ही ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टमवर देखील काम करत आहोत. ज्यामुळे सेमी हायस्पीड ट्रेन चालवता येतील. वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रायल रनमध्ये आम्ही दाखवले की 180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये पाण्याने भरलेला ग्लास ठेवला होता आणि तो अजिबात हलला नाही. यामुळे  आम्ही जगाला आश्चर्यचकित केले, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

७२ वंदे भारत गाड्यांचे उत्पादन होईल सुरू –

वंदे भारतच्या यशस्वी चाचणीनंतर उर्वरित ७२ गाड्यांचे उत्पादन सुरू होईल. तिसर्‍या वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग ताशी १८० किलोमीटर असेल. ती ५२ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडेल. तर बुलेट ट्रेन हा वेग ५५ सेकंदात पकडते. पहिल्या पिढीतील वंदे भारत ट्रेन 54.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत, एक नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते वैष्णोदेवी, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

First Published on: September 16, 2022 9:36 AM
Exit mobile version