विष्णुवतार प्रगटला, आता तरी अच्छे दिन येतील का?

विष्णुवतार प्रगटला, आता तरी अच्छे दिन येतील का?

रमेशचंद्र फेफरे

मी कलकी म्हणजे विष्णूचा दहावा अवतार आहे. मला संपूर्ण जगाची चिंता आहे. जगाच्या कल्याणासाठी मला ध्यानधारणा आणि जप करणे गरजेचे आहे. हे केल्याने आता तरी अच्छे दिन येतील असा आश्वाद गुजरातमधील एका कर्मचाऱ्यांनी केला आहे. अच्छे दिन येण्यासाठी मला कार्यालयात बसून ध्यानधारणा करता येणार नाही असा दावा गुजरातमधील एका सरकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. ध्यानधारणा करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी चक्क नोकरीवर लाथ मारल्याचे समोर आले आहे. रमेशचंद्र फेफरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. फेफरे हे सरदार सरोवर निगमच्या वडोदरा येथील कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

रमेशचंद्र फेफरे हे गेल्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात फक्त १६ दिवस कामावर हजर राहिले आहेत. त्यांच्या या वर्तणुकीबाबत विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिसला फेफरे यांनी हे अजब उत्तर दिले आहे. ते म्हणाले की मी २०१०साली जेव्हा कार्यालयात बसलो होतो, त्यावेळी मी कलकी आहे असा साक्षत्कार मला झाला. माझ्यात दैवी शक्ती असल्याचेही मला समजले. त्यामुळे आता विभागानेच ठरवावे की त्यांनी मला कार्यालयात बोलावून नुसते बसवून ठेवावे की जगाच्या कल्याणासाठी मी जी ध्यानधारणा करत आहे, ती मला करू द्यावी, असा प्रश्नही देखील त्यांनी विभागाला केला आहे. तुम्हाला मी सांगतो ते खरं वाटणार नाही. पण मी खरंच विष्णूचा दहावा अवतार असून आगामी काही दिवसांत मी ते सिद्ध करून दाखवणार असून माझ्या ध्यानधारणेमुळेच गेल्या १९ वर्षांपासून देशात चांगला पाऊस पडत असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.

First Published on: May 19, 2018 10:07 AM
Exit mobile version